Ad will apear here
Next
मुझे कोई मिल जायेगा, जो मुझे समझ सके...


पाळीव प्राणी जिथे विकत मिळतात, त्या दुकानात एक लहान मुलगा जातो. काचेच्या दाराबाहेरूनच तो आतमध्ये खेळत असलेली कुत्र्याची लहान लहान पिल्ले पाहत उभा राहतो. शेवटी दुकानदार त्याला आत बोलावून विचारतो, ‘बेटा, काय पाहिजे?’ त्यावर मुलगा म्हणतो, ‘मला ना, एक लहान कुत्रा पाहिजे.’

त्यावर दुकानदार म्हणतो, ‘अरे बेटा, हे खूप महाग असतात.’

मुलगा खिशात हात घालून चिल्लर व एक-दोन नोटा मिळून वीस रुपये काढतो आणि म्हणतो, ‘दादा, हे घ्या पैसे.’

दुकानदार हसून म्हणतो, ‘अरे इतक्या पैशांत नाही येणार.’

मुलगा म्हणतो, ‘मग इतक्या पैशांत मी थोडा वेळ त्या कुत्र्यांच्या पिलाबरोबर खेळू शकतो का? त्याला हात लावून पाहू शकतो का?’

दुकानदार त्याचे पैसे त्याला परत देतो आणि पिलांसोबत खेळायला परवानगी देतो.

त्या पिल्लामध्ये एक छोटे पिल्लू कोपऱ्यात मलूल बसलेले, एक पाय खुरडत लंगडत हळूहळू चालत असते. बाकी पिल्लांसोबत खेळण्याचा प्रयत्न करत असते; पण इतरांप्रमाणे खेळू शकत नसते. बराच वेळ त्याला पाहून झाल्यावर मुलगा परत दुकानदाराकडे येतो आणि ‘त्या’ मलूल पिल्लाकडे बोट दाखवून म्हणतो, ‘दादा, ते पिल्लू कितीला आहे?’

दुकानदार म्हणतो, ‘बेटा, ते फार महाग नाहीये; पण ते तर लंगडे आहे. त्याचा एक पाय मोडला आहे. तो इतर पिल्लाप्रमाणे तुझ्यासोबत खेळू शकणार नाही. असले पिल्लू घेऊन तू काय करणार?’

यावर तो लहान मुलगा दोन पावले मागे येतो, आपल्या पँटची एक बाजू वर उचलून दाखवतो. ते पाहून दुकानदार दंग होतो.

कारण

*

*

*

*

लहान मुलाच्या त्या डाव्या पायाला स्टीलचे रॉड बसवलेले असतात. त्याचा तो डावा पाय अपंग असतो.

मुलगा म्हणतो, ‘दादा, पाहिलेत, मला पण एक पाय नाहीये. मीही त्याच्यासारखाच आहे; पण मला त्याच्यामुळे कोणी तरी असे मिळेल जे मला समजून घेईल. आणि त्यालाही कुणी तरी मी असा मिळेल, की जो त्याला समजून घेईल!!

मुझे कोई मिल जायेगा, जो मुझे समझ सके
उसे कोई मिल जायेगा, जो उसे समझ सके!!

दुकानदार निःशब्द होतो अन् थोड्या वेळाने भानावर येऊन हसत हसत ते कुत्र्याचे पिल्लू मुलाला देऊन म्हणतो, ‘घेऊन जा हे, पैसे नाही दिले तरी चालतील.’

त्या क्षणी मुलाच्या डोळ्यात आनंदाचा कल्लोळ उसळतो.

****

डीडी क्लास : बऱ्याच वेळा आपलंही असंच होत असतं त्या दुकानदारांसारखं!! फारसे काहीच माहीत नसताना आपण एखाद्याबद्दल काही तरी समज करून घेतो. ‘तू अमुकसाठी लायक नाहीस’ किंवा ‘तुला ते जमणार नाही’ असे ‘समज’ करून घेण्यापेक्षा थेट भेटून ‘समजून’ घेतलं तर????

विचार करा!!
- धनंजय देशपांडे
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZBBCN
Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language